"Dream, Dream, Dream! Conduct these dreams into thoughts and then transform them into action."
- Dr. A. P. J. Abdul Kalam

डबेवाल्या जोशीकाकूंचा दुबईतील मराठमोळा 'पेशवा'

14-07-2017 05:19 PM | Santosh D Patil


डबेवाल्या जोशीकाकूंचा दुबईतील मराठमोळा 'पेशवा' | My Indian Dream

डबेवाली ते ‘पेशवा’ची मालकीण’....

दुबईतील जोशी काकू. जोशी काकू अर्थात श्रीया जोशी. कुठलीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना स्वबळावर, अपार कष्ट करत दुबईत ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट यशस्वीरीत्या चालवतात श्रीया जोशी. नुसतं दुबईतच नाही तर स्वकष्टाच्या बळावर शारजामध्येही दुसरं ‘पेशवा’ रेस्टॉरन्टही त्यांनी सुरू केलं आहे. हॉटेल व्यवसायातच मर्यादित न राहता दुबईत किराणा व्यापार तसेच भारतीय मसाल्यांची निर्यातही त्या करतात. ‘निवांत’ नावाचा ‘स्पा’ही त्यांनी सुरु केला आहे. ‘पेशवा’ रेस्टॉरन्टचं नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलय. ‘डबेवाली ते ‘पेशवा’ची मालकीण’ जाणून घेऊ या श्रीया जोशी यांची यशाची कहाणी...

पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या श्रीया यांचे वडील वकील होते, घरात व्यावसायिक असं वातावरण नव्हतं. चारचौघींप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीया यांचं लग्न सचिन जोशी यांच्यांशी झालं. लग्नानंतर दोघेही पतीपत्नी सचिन यांच्या नोकरी निमित दुबईजवळच्या अजमान नावाच्या छोटय़ाशा इमिरेट्समध्ये आले. सुरवातीच्या दिवसात फक्त सचिनच्या पैशांवर घर सुरु होते. श्रीया यांना काहीतरी करून सचिन यांना हातभार लावावा असे वाटायचे. कारण वाढत्या खर्चात पैशांची तशी चणचण होतीच. एकदा त्यांच्या परिचयातील पवार काका त्यांच्याकडे जेवणाला गेले असता त्यांना जेवणाची चव खूप आवडली, त्यांनी डब्बा द्यावा असा आग्रह केला आणि इथेच श्रीया यांच्या व्यवसायाचा श्री गणेशा झाला. घरगुती जेवण कोणाला नको असतं, हळूहळू जेवणाच्या डब्याची संख्या वाढली आणि तब्बल १३५ डब्ब्यांची ऑर्डर श्रीया पूर्ण करू लागल्या. आणि ‘पेशवा’ रेस्टॉरन्टचा जन्म झाला..’

२०१२ मध्ये ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट सुरू झालं. रेस्टॉरन्ट मध्ये मेनू काय ठेवायचा यावरही बराच विचार केला. इतर रेस्टॉरन्ट प्रमाणे पंजाबी, गुजराती जेवण न ठेवता फक्त महाराष्ट्रीयन पद्धतीच जेवण ठेवायचं ठरलं. त्यात महाराष्ट्रातील सर्वच प्रांतांचा विचार केला. कोल्हापुरी, वऱ्हाडी, मालवणी, कोकणी, नागपुरी शाकाहारी आणि मांसाहारी. सचिन देवधर यांनी आणि त्यांच्या आईनी सर्व स्टाफला प्रशिक्षण दिलं. दोन महिने पुरणपोळी आणि उकडीचे मोदक सर्व मुलांना शिकवले. त्यामुळे पुरणपोळ्या आणि उकडीचे मोदक पुण्यापर्यंतच मर्यादित राहिले नाहीतर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. ‘पेशवा’ चा श्री गणेशा झाल्यापासून आजपर्यंत रेस्टॉरन्ट ग्राहकांनी भरलेलं आहे. मराठीच नव्हे तर अमराठी लोकंही मोठ्या प्रमाणात जेवण करायला येतात.”

‘पेशवा’ हे नावाप्रमाणेच अस्सल मराठी संस्कृतीचं, परंपरेचं प्रतीक आहे. मराठी राज्याचं पेशवेकालीन वातावरण, मराठी संगीत आणि सणावाराला चांदीच्या ताटवाटीत बसणारी पंगत अमराठी लोकांनासुद्धा अतिशय भावते. इथे सर्वच सणवार मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात गुडीपाडव्यापासून दिवाळी पर्यंत सर्वच सण इथे पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे परदेशात आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या भारतीयांना ‘पेशवा’ मध्ये सणांचा आनंद घेता येतो. इतकेच नाही तर श्री सत्यनारायण पूजा, गणपती पूजा अशा सर्व पूजांच्या प्रसादाच्या ऑर्डर लोक अतिशय विश्वासाने देतात. महाशिवरात्रीला उपवासाची थाळी मिळते. इथे पूजेचा स्वयंपाक हा वेगळ्या भांड्यातून वेगळ्या जागेत होतो.

यूएईमध्ये राहून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी माणसाला दरवर्षी पेशवातर्फे ‘पेशवा सन्मान पुरस्कार’ दिला जातो. भारतातून आलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ‘पेशवा’ रेस्टॉरन्ट अतिशय आता उत्तमप्रकारे सुरु आहे. दिवसेंदिवस ग्राहकांच्या संख्येमध्ये भरच होते आहे. ‘पेशवा’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शारजामध्येही त्याची दुसरी शाखा उघडली आहे. रेस्टॉरन्ट व्यतिरिक्त आणखी काहीतरी करावं असा विचार मनात घोळत असताना एक छानसा योग जुळून आला आणि ‘निवांत’ या नावाने ‘स्पा’ सुरू केला.’’
‘‘जनरल ट्रेडिंगचं लायसन्सही मिळाल्यामुळे ट्रेडिंगही सुरू केलं आहे. आफ्रिका व इराणला भारतीय मसाले, इतर पदार्थ निर्यात करतो. दुबईतच किराण्याचं दुकानही सुरू केलं आहे. हे सर्व नवीन व्यवसाय नव्यानेच सुरु केले आहेत. समोरून चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा, भरपूर मेहनत करायची आणि सातत्याने काम करत राहायचं हेच आमच्या पती-पत्नीच्या यशस्वी जीवनाचं सूत्र आहे  whatsup_share
Support the Initiative

Buy the My Indian Dream merchandise to support our various initiatives. The premium merchandise enables you to make a statement in style as well as enable our efforts.