"Dream, Dream, Dream! Conduct these dreams into thoughts and then transform them into action."
- Dr. A. P. J. Abdul Kalam

‘डी.एस.के.’ महाराष्ट्राला जगाच्या पाठीवर नेणारा उद्योजक

19-07-2017 02:10 PM | Santosh D Patil


‘डी.एस.के.’  महाराष्ट्राला जगाच्या पाठीवर नेणारा उद्योजक | My Indian Dream

Image Source

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके....

‘डी.एस.के.’ अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी ...घराला घरपण देणारी माणसं
दीपक सखाराम कुलकर्णी (दीपक सखाराम कुलकर्णी) हे पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिक आहेत. डी.एस. कुलकर्णी हे डी.एस.के बिल्डर्स म्हणून ओळखले जात असून "घराला घरपण देणारी माणसं" हे डी.एस.केंचं घोषवाक्य आहे. त्यांनी अनेक उद्योगांमध्ये पाय पसरले आहेत आणि त्यांच्या उद्योगांचा वार्षिक टर्न ओव्हर १६०० कोटी रूपयांचा आहे.

विश्वातील एक नाव म्हणजे ‘डी.एस.के.’ अर्थात दीपक सखाराम कुलकर्णी! घरात उद्योगधंद्याची अजिबात पार्श्वभूमी नसताना स्वबळावर, मेहनतीवर, अनेक टक्के-टोणपे खात एक नव्हे तर बहुउद्योगाच्या प्रेरणादायी इमारतीवर एकेक मजले चढवत त्यांनी अख्खं ‘डीएसके विश्व’चं उभं केलं.

डी.एस्.के. यांचा जन्म पुण्यातील कसबा पेठेतला असून आई शाळेत नोकरी करून उरलेल्या वेळात शिकवण्या करणे, कपडे शिवून देणे असे उद्योग करी. पुढे मात्र आईने स्वतःच्या हिंमतीवर एक शाळा काढली. वडील पुण्याच्या हाय एक्स्प्लोझिव फॅक्टरीमध्ये वॉचमन म्हणून काम करीत. पुण्यातल्या तपकीर गल्लीतल्या 'दगडीवाडा' शाळेत सुरुवातीचे शिक्षण झाले. पुढे २री ते ४थी पुणे कॉर्पोरेशनच्या २५ नंबरच्या शाळेत तर ५वी ला मंडईतील टिळक पुतळयापाशी असलेल्या कार्पोरेशनच्या १ नंबरच्या शाळेत आणि ६ वी ते मॅट्रिक भारत हायस्कूलमधे त्यांचे शिक्षण झाले. पुढे कॉमर्स शाखेची पदवी घेतली.

शाळा सुटली की आसपासचे मित्र वडिलांच्या धंद्याला हातभार लावीत. ते पाहून डी. एस. के. सुद्धा कुठे चण्यामण्या बोरे विकण्याच्या गाडीवर काम कर, कुठे पोत्यावर बसून कैर्‍या वीक, भाजी वीक असले उद्योग वयाच्या सातव्या वर्षापासूनच करू लागले. तिथेच त्यांना कोणतीही वस्तू विकण्याची गोडी निर्माण झाली. मुख्यत: काही काम केले की पैसे मिळतात हे फारच लहानपणी कळले. नंतर पुढे त्यांनी पेपर टाकणे, दिवाळीत फटाके विकणे, काकांच्या भाजीच्या गाडीवर भाजी विकणे असे व्यवसाय केले. यातून एखादी विशिष्ट वस्तु विकताना ती विकण्याची विशिष्ट पद्धत असते हे ते शिकले.

आज विविध उद्योगातून १६०० कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल करणारे डिएसके यांचं उद्योग साम्राज्य भारतात पुणे, मुंबई, बंगळुरू, कोल्हापूर सारख्या मेट्रो सिटीजमध्ये तर पसरलं आहेच पण त्याहीपलीकडे महाराष्ट्राला जगाच्या पाठीवर नेणारा हा उद्योजक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, बहारेन, नैरोबी, कुवेत या देशांतही ‘घर’ करून राहिला आहे.

घरे बांधायला यातूनच पुढे सुरुवात झाली व डी.एस.कुलकर्णी आणि कंपनी या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना झाली. याच बरोबर टोयोटाची एजन्सी, जनरल मोटर्सची एजन्सी, ॲरोमा केमिकल्स, हॉटेल व्यवसाय आणि आजकालच्या परवलीच्या धंद्यात - अर्थात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अशा अनेकविध उद्योगांत त्यांनी स्वतःचा पाय रोवला.
डी.एस. कुलकर्णींनी सामाजिक आणि शैक्षणिक गरजांसाठी डी.एस.के फाउंडेशनची निर्मिती केली.. त्यांच्या डी.एस.के. फाउंडेशनतर्फे ते 'डी.एस.के. गप्पा' किंवा मान्यवरांची भाषणे यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम राबवीत असतात. ते स्वतः चांगले लेखक असून त्यांच्या व्यवसायाच्या जाहिराती ते स्वतः लिहितात. ते उत्तम व्याख्याते आहेत. रेडिओवर आणि अन्यत्र त्यांची भाषणे होत असतात.
डी .एस. कुलकर्णी यांच्या दिवंगत पत्‍नीच्या नावाचे ज्योती फाउंडेशन आहे. त्यांच्या जन्मदिनी-ज्योती सन्मान दिनी हे फाउंडेशन गुणवान स्त्रियांना पुरस्कार देते.  whatsup_share
Support the Initiative

Buy the My Indian Dream merchandise to support our various initiatives. The premium merchandise enables you to make a statement in style as well as enable our efforts.