"Dream, Dream, Dream! Conduct these dreams into thoughts and then transform them into action."
- Dr. A. P. J. Abdul Kalam

भारताच्या "अग्नी" कन्या..सौ टेसी थॉमस यांची गगनभरारी

20-07-2017 02:00 PM | Santosh D Patil


भारताच्या

डॉ टॅसी थॉमस ..पहिल्या .भारतीय 'मिसाईल वूमन'

हम भारत कि बाला है..फुल भी ही और ज्वाला भी..

भारताच्या "अग्नी" कन्या..सौ टेसी थॉमस यांची अवकाशाला गवसणी घेणारी गगनभरारी. भारताने अग्नी ५ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.."या यशामुळे भारताची मान जगात उंचावली गेली आहे, भारताच्या संरक्षणसिद्धतेतील हा मैलाचा दगड आहे.

ह्या यशस्वी प्रकाल्पामागच्या किमयागार आहेत भारताच्या "मिसाईल
वूमन"व जेष्ठ सुरक्षा शास्त्रज्ञ,DRDO च्या PROJECT DIRECTOR सौ टेसी थॉमस

भारताच्या महत्त्वाच्या अग्नी पाच या क्षेपणास्त्र कार्यक्रमाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिला वैज्ञानिकावर सोपवण्यात आली असून, टॅसी थॉमस पहिल्या भारतीय 'मिसाईल वूमन' म्हणून ओळखल्या जात आहेत.
डॉ टॅसी थॉमस यांनी केरळच्या त्रिशुर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक आणि पुण्यातील डिफेंस इंस्टट्यूटमधून एम टेक केले आहे. थॉमस सॉलिड सिस्टम्स प्रोपेलेंटमध्ये पारंगत आहेत. अग्नी दोन क्षेपणास्त्रात हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीच त्यांना अग्नी दोनची जबाबदारी दिली होती.

पाच हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची क्षमता अग्नी पाचमध्ये आहे. त्याला आणखी विकसीत करण्याचे काम टॅसी थॉमस यांच्यावर सोपवण्यात आले आहे. मिसाईल मॅन म्हणून माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांना ओळखले जात. आता मिसाईल वूमन म्हणून थॉमस यांचे नाव घेतले जात आहे. आई जिजाबाईसाहेबांचा जाज्वल्य वारसा पुढे चालवणाऱ्या भारतमातेच्या या आधुनिक अग्नी कन्येला व रणरागिणीला कोटी कोटी सादर प्रणाम.  whatsup_share
Support the Initiative

Buy the My Indian Dream merchandise to support our various initiatives. The premium merchandise enables you to make a statement in style as well as enable our efforts.