"Dream, Dream, Dream! Conduct these dreams into thoughts and then transform them into action."
- Dr. A. P. J. Abdul Kalam

"आयपीएस" या तीन अक्षरांत वेगळीच जादू सामावलेली असते

18-07-2017 04:00 PM | Santosh D Patil


स्व -हेमंत करकरे.....पोलिसातील " माणसाचा " चेहरा

एक थोर वाचक,लेखक ,वक्ता व सामान्य माणसाची जाण असणारा "पोलिसातील माणूस आयपीएस' या तीन अक्षरांत वेगळीच जादू सामावलेली असते. त्यामुळेच उत्तम शैक्षणिक पात्रता, उत्तम नोकरी असताना नागरी सेवेचे आकर्षण वाटते आणि कर्तबगार अधिकारी घडत जातात. असाच प्रकार ज्येष्ठ पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्या बाबतीत घडला. मूळचे नागपूरचे 
मेकॅनिकल इंजिनीअरिंगची डिग्री, मग मृदू स्वभावाच्या, पण कणखर व्यक्तिमत्त्वाच्या या तरुणाने भरारी घेतली. नजरेत भरेल एवढी उंची आणि जिंदादिल स्वभाव ..

मग मॅनेजमेंटमधील पोस्ट ग्रॅज्युएशन अशा शैक्षणिक पात्रतेवर मोठी नोकरी चालून येणे स्वाभाविक होते. असलेले करकरे यांच्याकडे दहशतवादविरोधी पथका'चे (एटीएस) प्रमुखपद चालून आले. करकरे यांना तेव्हा देशातील सवोर्त्तम मानल्या जाणाऱ्या 'हिंदुस्थान लिव्हर'मध्ये तीन वर्षं कर्तृत्वाची संधी मिळाली. तिथे अनुभव घेत असतानाच आयपीएस या अक्षरांनी त्यांना आकषिर्त केले. त्यानंतर १९८२ सालच्या आयपीएस कॅडरमध्ये त्यांचे नाव झळकले. अधिकाऱ्याकडे पूवीर्पासून आव्हानात्मक जबाबदाऱ्या येत गेल्या. अमली पदार्थ विरोधी खात्यापासून आथिर्क गुन्हे शाखा येथेही त्यांनी चांगलेच कर्तृत्व गाजवले. त्यासह चंदपूरमध्ये नक्षलवाद फोफावण्याच्या काळात पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

नंतरच्या काळात 'रिसर्च अँड अॅनालिसिस' (रॉ)मध्ये तब्बल दहा वर्षं त्यांनी सेवा केली. या काळातच संयुक्त राष्ट्रसंघासाठीही काम करण्याची संधी मिळाली. हा काळ त्यांच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरवला. महाराष्ट्रात आथिर्क गुन्हे, अमलीपदार्थ, नक्षलवाद अशा विविध स्तरांवरील आव्हाने पेलणाऱ्या करकरे यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा अभ्यास करण्याची अनोखी संधी साधली.

करकरे यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद परिपूर्ण जाणून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळेच ज्ञानमार्गाचा अवलंब करताना त्यांनी अष्टपैलुत्व सिद्ध केले. 'रॉ'सारख्या संघटनेत काम केल्याने त्यांना अनेक पैलूंचा अभ्यास करता आला. यानंतर त्यांच्याकडे मुंबईत सहपोलिस आयुक्त (प्रशासन) जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी अल्पावधीतच तिथेही आपली कल्पकता आणि कर्तृत्व सिद्ध केले.

सामान्य पोलिसांपासून ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिवसभर फायलींचा ढीग ते मोकळा करत असत. त्यावेळीही त्यांच्या केबिनबाहेर समस्या घेऊन येणाऱ्या पोलिसांची रांग लागलेली असायची. तरीही न कंटाळता प्रत्येकाला वेळ देत त्याचा प्रश्न सुटावा याकडे त्यांचा कल होता. पोलिसांची रखडलेली प्रमोशन्स लाल फितीतून मोकळी व्हावीत म्हणून त्यांनीच प्रयत्न केल्याने तो मार्गी लागला. याचवेळी अपंग, वयोवृद्धांसाठी एसएमएस सेवा सुरू होण्यात त्यांचा वाटा आहे. अशा कार्यकुशल अधिकाऱ्याकडे एटीएसची जबाबदारी आली आहे.

पण नियतीला के मंजूर नव्हते त्या .मुळे २६/११ रोजी जो मुंबईवर ,ताजमहाल हॉटेल वर यात हा कर्तबगार अधिकारी मुंबई ने गमावला .तो कायमचाच ........एक थोर वाचक,लेखक ,वक्ता व सामान्य माणसाची जाण असणारा "पोलिसातील माणूस " आपण हरवून बसलो....  whatsup_share
Support the Initiative

Buy the My Indian Dream merchandise to support our various initiatives. The premium merchandise enables you to make a statement in style as well as enable our efforts.